ब्लाॅकबस्टर ठरलेल्या पठाणबाबत मेकर्सची मोठी घोषणा

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची चर्चा सुरू आहे.

पठाण चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर पठाणनं याबाबतीत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाण आतापर्यंत जगभरातून 1000 कोटींचा गल्ला कमवला आहे.

आता पठाणला मिळालेला प्रतिसाद पाहून हा चित्रपट अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा चित्रपटाच्या मेकर्सचा प्रयत्न आहे. यासाठी निर्मात्यांनी एक मास्टर प्लॅन केला आहे.

दिनांक 18 फेब्रुवारीला ‘पठाण डे’ घोषित करण्यात आला आहे. या दिवशी सिनेपोलिस, पीव्हीआर तसेच आयनाॅक्स या ठिकाणी अत्यंत कमी किंमतीत पठाणचे तिकीट उपलब्ध असणार आहे. या दिवशी पठाणचं तिकीट फक्त 110 रूपये असणार आहे.

दरम्यान, पठाण चित्रपटातील ‘बेशरम’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच पठाण चित्रपटावर काहींनी जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. आता पठाण सुपरहिट ठरला तरीही काहींचा पठाणला विरोध कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-