बॉलिवूडला मोठा धक्का; ‘या’ एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शकाचं निधन!
मुंबई | 2020 मध्ये बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे निधन झाले आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या तर एकेकाळी आपल्या अभिनयाची छाप उमटवून आजपर्यंत त्या अभिनयाचं लोकांना वेड लावलेले रिषी कपूर यांनी देखील जगाचा निरोप घेतला. एवढंच नाही तर बॉलिवूड पासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख बनवणारे इरफान खान यांचं देखील निधन झालं. अशातच आता पुन्हा एकदा बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे तारिक शहा यांनी मुंबईमध्ये शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. तारिक यांना किडनाचा आजार असल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त असल्या कारणाने डायलेसिसवर होते.
तरिक शहा हे अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती आहेत. तारिक यांच्या मृत्यूनंतर सेलेब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरुन माहिती दिली. त्यांनी ट्वीट केल्याप्रमाणे मुंबईमधील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ‘कडवा सच’ या कार्यक्रमाचे अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट ‘जनम कुंडली’चे दिग्दर्शक असलेले तारिक शहा यांचं निधन झालं आहे. तसेच तारिक शहा हे शोमा आनंदचे पती असून देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ. असं देखील विरल यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहलं आहे.
दरम्यान, तारिक शहा आणि शोमा आनंद यांना एक मुलगी देखील आहे. शनिवारी रात्री अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
थोडक्यात बातम्या-
एक हात गळ्यात दुसरा छातीवर; पतीला कल्पनाही नव्हती की पत्नीच्या डोक्यात काय शिजतंय!
बाॅलिवुड स्टार अक्षय कुमारला कोरोनाची लागण
‘ही’ गोष्ट करा तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही, पोलिसांनीच दिला शब्द
विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!
झुम कॉल सुरू असतानाच बड्या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, व्हिडीओ व्हायरल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.