बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा शर्मांना मोठा झटका, कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. करुणा शर्मा यांनी गाडीत पिस्तूळ बाळगल्या प्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर करुणा शर्मांनी लगेचच जामीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी तपास कार्यात संपुर्ण सहकार्य देण्यास तयार असून मला जामीन द्यावा, अशी मागणी करुणा शर्मां यांनी केली होती.

करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेची मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होती. त्यामुळे करुणा शर्मा यांना जामीन मिळेल का नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू न मांडल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, करुणा शर्मा यांची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडी देखील वाढ झाली आहे. करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीमधला मुक्काम वाढल्याने त्यांच्या वकिलांनी पोलीस जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लावला आहे.

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह मॅचमध्ये बॅनरला लटकली होती मांजर अन्…; थरारक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

“स्वतःच्या बुडाखाली काय जळतं ते बघा, मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले?”

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More