बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वरूण गांधींना मोठा धक्का! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं कार्यकारिणीतून डच्चू

नवी दिल्ली | भाजपने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. 80 नेत्यांना भाजपने या यादीत स्थान दिलं आहे. अनेक नविन नेत्यांना जेपी नड्डा यांच्या या टीममध्ये स्थान देण्यात आलंय. देशातील वातावरण लखीमपूर घटनेवरून पेटलेलं असताना या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीतून भाजपने खासदार वरूण गांधी आणि मेनका गांधी यांना डच्चू दिला आहे.

गेली दीड वर्ष झाले केंद्रीय कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या बाजूने वरूण गांधी यांनी अनेकदा ट्विट केले आहेत. परिणामी भाजप नेतृत्व वरूण गांधी आणि मेनका गांधी यांच्यावर नाराज होते. वरूण गांधी यांनी नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर घटनेत लक्ष घालण्याची मागणी केली होती.

नरेंद्र मोदी 2014 ला पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळात मेनका गांधी यांचा समावेश होता. पण नंतर 2019 ला पुन्हा सत्ता आल्यानंतर मेनका गांधी यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आलं होतं. आता थेट राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्यानं मेनका गांधी यांच्यावर पक्ष नेतृत्व नाराज असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, गेली काही दिवस झाले केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ वरूण गांधी सातत्याने भूमिका मांडत आहेत. वरूण गांधी हे एकेकाळी भाजपचा उत्तर प्रदेशमधील युवा चेहरा होते. पण आता त्यांच्या या गच्छंतीने त्यांच्या पाठिशी पक्ष नसल्याचं चित्र दिसत आहे.

थोडक्यात बातम्या 

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या! पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नवज्योत सिंग सिद्धू 1000 गाड्यांच्या ताफ्यासह लखीमपूरला रवाना; युपीत तणावाचं वातावरण

भारतीय संघाच्या अडचणी वाढणार??, दुखापत असतानाही ‘हा’ खेळाडू खेळतोय आयपीएल!

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 25 किलोमीटरसाठी वापरलं हेलिकॉप्टर

‘गर्दी वाढवण्यासाठी आम्हाला जबदस्तीने बोलवलं’; योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More