बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | वेळी-अवेळी पडणारा पाऊस, खराब हवामान, निसर्गाची न मिळणारी साथ या सर्व गोष्टींवर मात करतो. आपल्या शेतात बाजारभावाची किंमत न करता मेहनतीच्या जोरावर चांगलं उत्पादन घेत असतो. सध्या देशात टोमॅटोचे भाव कमी झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी टोमॅटोच्या प्रश्नावर पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

राज्यातील शेतकरी सध्या टोमॅटोचे भाव पडल्यामुळे त्रस्त होऊन आक्रमक झाले आहेत. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालात राज्य सरकारला जो काही तोटा होईल, त्या तोट्यात केंद्र सरकारचा 50 टक्के वाटा असेल असं केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आलं आहे. तसेच याबाबतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवावा अशीही त्यांनी राज्याला विनंती केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात यावर्षी टोमॅटोचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न झालं आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे भाव पडले आहेत. सध्या राज्यात टोमॅटोचे भाव प्रतिकिलो 2 ते 3 रूपये असे आहेत. या अल्पशा भावामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

 

थोडक्यात बातम्या –

“भाजपकडून ईडी, सीबीआय लावून धमकावण्याचं काम सुरूये, पण आम्ही घाबरत नाही”

“…या नेत्यांमुळे भाजप-शिवसेनेत दुरावा आला”

“देवाच्या सुपर कॉम्प्युटरमुळे कोरोना आला, त्यानेच मरणाऱ्यांची यादी तयार केली”

आगामी महापालिका निवडणुकांबाबत ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

‘हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचं मुख्यमंत्र्यांना दुसरं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More