‘…तर थेट जेलमध्ये होईल रवानगी’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने (Traffic Rules) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ट्रॅफिकचे नियम मोडले तर थेट जेलमध्ये रवानगी होणार असल्याचं कळतंय.

ट्रॅफिकचे नियम वारंवार मोडणं हा अजामिनपात्र गुन्हा करा, असा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केलाय. महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांनी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे निर्देश दिले होते. 2022 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 40 टक्के पादचारी होते. तेव्हा वेगाने गाडी चालवत दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकांना अटकाव करण्यासाठीच हा प्रस्ताव आणला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-