आफताबला तिहार जेलमध्ये करायचंय ‘हे’ काम; पोलिसांकडे केली मोठी मागणी

नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस आरोपी आफताबची (Aaftab) कसून चौकशी करत आहेत. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तो तिहार कारागृहात आहे. 

आफताबने कारागृह प्रशासनाकडे वाचनासाठी इंग्रजी कादंबरी आणि पुस्तकं देण्याची विनंती केली आहे. त्याच्या विनंतीनंतर प्रशासनानं त्याला पॉल थेरॉक्सनं लिहिलेलं ‘द ग्रेट रेल्वे बाजार’ हे पुस्तक उपलब्ध करून दिलं आहे.

प्रोटोकॉलनुसार आम्ही कैद्याची काळजी घेत आहोत. त्यानं इंग्रजी कादंबऱ्या आणि इतर पुस्तकं उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. साहित्यिक उपक्रमात त्याला अडकून रहायचं आहे, असं तिहार जेलमधील अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सध्या आम्ही त्यांना पॉल थेरॉक्स यांनी लिहिलेलं ‘द ग्रेट रेल्वे बाजार’ ही पुस्तक उपलब्ध करून दिलं आहे. तुरुंगातील लायब्ररीतूनच हे पुस्तक देण्यात आलं आहे. त्यानंतर त्याला आणखी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, तुरुंग प्रशासनाने आफताब पूनावालाच्या जेल क्वार्टरच्या बाहेर सुरक्षा वाढवली आहे. त्याच्या बॅराकबाहेर अतिरिक्त रक्षक तैनात केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More