जालना | शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये (Crypto) प्रमोटर म्हणून काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. यामुळे खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेवरून जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो (Crypto) करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यात किरण खरात यांना क्रिप्टो करंसीमध्ये बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते. त्यानुसार विजय झोल यांनीही पैसे गुंतवले, मात्र जागतिक मंदी असल्याने अनेकांचे पैसे बुडाले.
पोलिसांनी या प्रकरणी विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-