बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य

पुणे | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या ठिणगीचा आता वणवा पेटला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेतील मोठा गट फुटल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाच्या बंडखोरीवर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनेत आत्ता बंडखोरी झाली. पण अशी बंडखोरी दीड वर्षापूर्वीही झाली होती. मात्र, तेव्हा या बंडखोरीची दखल घेतली गेली नाही, अशी खंत शिवाजीराव आढळराव यांनी व्यक्त केली आहे.

खेड पंचायत समिती इमारत शिवसेनेच्या सरकारमधून मिळालेल्या कामाचं क्रेडिट शिवसेनेला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेला खटाटोप शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण आहे, असं मोठं वक्तव्य शिवाजीराव आढळराव यांनी केलं आहे. शिवसेनेच्या ऱ्हासाचे कारण राष्ट्रवादी असल्याचा गंभीर आरोप करत आढळरावांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, दीड वर्षापूर्वी खेड येथे झालेल्या बंडखोरीची आठवण करून देत आढळरावांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. त्यावेळी दुर्देवानं बंडखोरी करणाऱ्या गद्दारांचा निषेध करावा वाटला नाही, असंही आढळराव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका

“महाराष्ट्रात असता तर कोणत्याही बिळातून फरफटत आणलं असतं”

“मुंबईत घुसू देणार नाही, 72 तास मुंबई विमानतळाला घेराव घालू”

BREAKING | संजय राऊतांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी बोलावलं

आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More