राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | आमच्या सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court) 14 फेब्रुवारीला सलग सुनावणीच्या जे तारीख दिली आहे. ती आम्हाला मान्य आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

लवकरात निर्णय होणं देशाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे. 14 फेब्रुवारीला याच्यावर सलग सुनावणी होऊ शकते. त्यामुळे तेव्हा काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आजच्या सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही याव प्रतिक्रिया दिली आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. ही सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे ती महत्वाची आहे. व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात सदस्यांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी 14 फेब्रवारी रोजी घेण्याचा निर्णय दिला.

महत्त्वाच्या बातम्या-