Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) सरकारने जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून येत्या 17 ऑगस्टला 3 हजार रुपये मिळणार आहेत. यानंतर राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे किती दिवस मिळणार? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिती तटकरे बोलत होत्या.
“प्रत्येक महिन्याला 1500 मिळणार”
महिलांना पुढचे 6 महिने तरी टेन्शन नाही. कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत ही कमीत कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे, असं त्या म्हणाल्या.
कोणी कितीही काहीही अपप्रचार केला तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी राज्यातील महिलांनी महायुतीच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन अदिती तटकरे यांनी केलं आहे.
Majhi Ladki Bahin Yojana | “अपप्रचाराला बळी पडू नये”
महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात आलेली 1 रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे.
लाखोंच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्याअर्थी त्यांनाही योजना आवडलेली आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. कुठल्याही दुसऱ्या योजनेवर लाडली बहीणमुळे अजिबात परिणाम पडलेला नाही, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी शरद पवारांना घेरलं
सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…
“आम्ही घटस्फोट घेत आहोत…”, अभिषेक बच्चनच्या खुलाशाने खळबळ
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ साठी मंत्री अदिती तटकरे मैदानात, पुण्यात जंगी कार्यक्रम
‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा