दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर!
मुंबई | पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र यात काही आमदार नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात शिंदे-भाजप युतीतील 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.
शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा या तिघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये महायुती झाल्यानंतर कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप-शिंदे 60-40 टक्के या फॉर्म्युल्याने मंत्रिपदांचे वाटप होणार आहे, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.
दुसऱ्या50-50 या फॉर्म्युल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगणाराही एक वर्ग आहे. नेमक्या कोणत्या फॉर्म्युल्याने यंदाचा कॅबिनेट विस्तार होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.