काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

Eknath Shinde | महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्यानं ते आपल्या मुळगावी दरे येथे आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकीकडे नाराजीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकती बिघडल्यानं डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी त्यांच्या दरे येथील निवासस्थानी दाखल झालं आहे.

एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली

दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे 105° असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचं समजतंय. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणं पसंत केलं.

मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदाची चर्चा सुरू असतानाच अचानक एकनाथ शिंदे हे आपल्या मुळगावी दरे येथे आल्यानं राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणून ते आपल्या गावी दरे येथे आले असं म्हणणं चुकीचं आहे.  मला वाटतं त्यांनी एका वाक्यात आपलं व्यक्तीमहत्त्व महाराष्ट्रासमोर आणलं आहे. मी नाराज होऊन रडणारा नाही तर लढणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला धावपळीमुळे काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात, असं उदय सामंत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक

आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख व ठिकाण ठरलं; कधी होणार?

राज्यातील 22 उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय; फेर मतमोजणी होणार?