‘पठाण’ च्या निर्मात्यांना झटका; कमाईवर होऊ शकतो मोठा परिणाम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बहुचर्चित पठाण (Pathan) चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड सध्या पठाण मोडत आहे. बाॅलिवूडमधील सगळ्यात जास्त कमाई करणार पठाण हा पहिला चित्रपट ठरला आहे. अशातच चित्रपटाचे निर्माते आणि शाहरुखसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

पठाण चित्रपट ऑनलाइन लीक (Leek) झालेला आहे. अनेक पायरेटेड ऑनलाईन साईट्सवर (Pirated online sites) पठाण चित्रपट उपलब्ध झाला आहे. यामुळे पठाणच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इन्स्टंट मॅसेजिंग अॅप टेलिग्रामवरदेखील लीक झाला आहे. यामुळे पठाणची कमाई घसरण्याची शक्यता आहे.

चित्रपट अनेक साईटस्, चॅनेल आणि ग्रुपवर शेयर करण्यात आला आहे. 480p,720p,1080p या रिझोल्यूशनमध्ये उपलब्ध झाला आहे. अनेक वेगवेगळ्या टेलिग्राम (Telegram) ग्रूपवर पठाण शेयर करण्यात आला आहे. ही बामती समजताच अनेक चॅनेलनी तो काढून टाकला आहे.

दरम्यान, अगदी पहिल्या आठवड्यातच पठाण चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. ‘दंगल’ चित्रपटाला मागं टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट लीक होण्याची ही पहिली वेळ नाही.यापूर्वीदेखील पंचायत-2, काश्मीर फाईल्स (Kashmir files) हे चित्रपट देखील लीक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या