बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात पुन्हा मृत्यूतांडव! तीन बॉम्बस्फोटात तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

काबूल | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यापासून आतापर्यंत दहशतवाद्यांकडून अनेक हल्ले करण्यात आले. त्यामध्ये अनेक अफगाण नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अलिकडेच अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये असलेल्या नागरिकांना काबूल जवळील हॉटेल सोडण्याचा इशारा दिला होता. अशातच आता शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये एका मशिदीमध्ये दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आल्यामुळे अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

अफगाणिस्तानमधील कंधार इमाम बारगाह मशिदीमध्ये शुक्रवारी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोट घडून आलेत. त्यावेळी नागरिकांची पळापळ सुरू झाली. त्यावेळी शिया नागरिक मशिदीमध्ये नमाज अदा करत होते. अचानक झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 53 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यांसदर्भात टोलो या न्युज चॅनेलने माहिती दिली आहे.

बॉम्बस्फोटमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमींना लवकरच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा दलाचे पथक ही घटना स्थळी दाखल असून पुढील कारवाई सध्या सुरक्षा दल करत आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद कोस्ती यांनी समाज माध्यामांना दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी या हल्ल्यामागे इसिसचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, तालिबान्यांची सत्ता अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर अफगाण नागरिकांना मोठ्या संकंटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली होती. त्यामुळे या संघटनेचा धोका तालिबानसह संपूर्ण जगाला भेडसावत आहे. अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या घटनांसंदर्भातही जगातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

“ज्यांनी परप्रांतियांच्या कानाखाली मारली त्यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणू नये”

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासारख्यांना ती उपमा देता येणार नाही”

‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी…’; भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे कडाडल्या

‘मला ‘या’ ठिकाणी किमान 1 तास बसायचंय’; नितीन गडकरींनी व्यक्त केली इच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More