बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाला संपवण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक’, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट आढळून येत असल्यानं लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे. यातच लसीकरण मोहिम राबवली जात असल्यानं कोरोना आटोक्यात येत आहे. अशातच आता कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगतिलं आहे.

इंजेक्शननंतर, कोरोना लसीचा बूस्टर डोस 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना संसर्ग आणि गंभीर आजार होण्यापासून रोखू शकतो, असं इस्रायलनं केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. फायझरने युनायटेड स्टेट्स एफडीएला 52 पानांच्या सादरीकरणात प्रस्ताव दिला आहे. यात नुकत्याच इस्रायलने केलेल्या अभ्यासाच्या डेटाचाही समावेश असल्याचं अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटलं.

कोरोना महामारी विरोधात अधिकाधिक सुरक्षितता मिळवण्यासाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस लोकांसाठी लवकरच आवश्यक होईल, असा दावाही डॉ. अँथनी फौसी यांनी केला आहे. अशातच आता भारतात बुस्टर डोस कधी दिला जाईल याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्वाची माहिती दिली आहे. वर्षाअखेरपर्यंत सर्व भारतीयांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार आरोग्य मंत्रालयानं केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका अजूनही असल्यानं सरकारकडून निर्बंधाचं पालन करण्यास सांगितलं जात आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्यांना रेल्वेतून उतरवलं, राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पहिला घोटाळा बाहेर काढताच दवाखान्यात गेले, दुसरा काढला तर….- किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More