बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना बुस्टर डोसबाबत घेण्यात आला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने समाधानकारक चित्र आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणही वेगाने सुरू असल्याने काहीसं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही कोरोनाची भिती संपली नसल्याने लसीकरणानंतरही बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची भिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांना बुस्टर डोस देण्यासंदर्भात कोरोना टास्ट आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र आता लवकरच बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचं कोरोना टास्क फोर्सकडून सांगण्यात येत आहे.

ज्या नागरिकांनी अगदी सुरूवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये कोरोनाची लस घेतली होती. त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय वैध्यकिय सेवेत असणाऱ्या म्हणजेच डॉक्टर्स, नर्स यांना हा बुस्टर डोस सर्वात प्रथम देण्यात येईल. त्यानंतर इतर नागरिकांसाठी बुस्टर डोस उपलब्ध असेल.

बुस्टर डोस हा विषाणूविरूद्ध शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. कोरोना विषाणूने शरिरात पुन्हा प्रवेश करू नये यासाठी नागरिकांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिक पुन्हा कोरोना नियमाचं उल्लघंन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बुस्टर डोससंबधित लवकरच निर्णय घेण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

ट्विटरवर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; टी 20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे

आधी लस घ्या मगच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More