बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

अनूपपूर | एका युवकाने गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट देता यावं यासाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना छत्तीसगडच्या भालूमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

आरोपी आसिफ खानने आपला मित्र राहुलकडून काही दागिने आणि मोबाइल लुटला. त्यानंतर त्याच्यावर दगडाने जोरदार हल्ला केला. त्यानंतर त्याला तिथेच टाकून पळ काढला. यानंतर काही लोकांनी जखमी राहुलला पाहिलं आणि त्यांनी  बिलासपूरच्या युनिटी रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असतानाच राहुलचा मृत्यू झाला.

या घटनेचा तपास करत असताना राहुलला सर्वात शेवटी त्याचा मित्र आसिफ खानसोबत पाहिलं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आसिफला चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आसिफ खानने गुन्ह्याची कबुली दिली.

काही दिवसांपूर्वी मृत राहुलचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्याने राहुलने त्याच्या पत्नीकडून सारे दागिने घेतले होते. एके दिवशी दारुच्या नशेत राहुलने सर्व दागिने आपला मित्र आसिफ खानला दाखवले होते. त्यानंतर आरोपीने मंगळसुत्राच्या लालसेपोटी आपल्या मित्राची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच आरोपी आरोपी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराची थेट पोलीस कोठडीत रवानगी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More