बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांच्या वाढदिवसासाठी केक आणायला गेलेल्या मुलाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. प्रेमासाठी माणसं काहीही करायला तयार होतात. अशीच एक धक्कादायक राजधानी दिल्लीत घटना समोर आली आहे. वडिलांचा वाढदिवस असल्यानं  केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये एक तरूण त्याच्या वडिलांचा वाढदिवस असल्यानं रिक्षामधून जात होता. जात असताना रस्त्यात ट्रॅफिक लागलं. त्यामुळे रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली.त्यानंतर त्याठिकाणी चार तरूण मुलं आली. त्यांनी रिक्षात बसलेल्या कुणाल नावाच्या मुलाला बाहेर ओढलं. त्यानंतर त्याठिकाणी कुणालला मारायला आलेली पोरं कुणालवर तुटून पडली. त्यांच्यापैकी एका आरोपीच्या हातात चाकू होता.

हातात चाकू असलेल्या तरूणानं चाकूनं कुणालवर हल्ला केला. त्यावेळी 19 वर्षीय कुणालला चौघांनी रस्त्यात ठार मारलं. आसपास असलेल्या माणसांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मंगळवारी दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, त्यानंतर रागाच्या भरातून हा खून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. कुणालच्या छाती, पाठ, पोट यावर अनेक वार आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणात सर्व बाजूनी चौकशी करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More