बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ मोटारसायकलचा बाजारात धमाका; विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले

नवी दिल्ली । सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामध्ये मोटारसायकलला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यावरून हे लक्षात येतं की, Auto Market ला अच्छे दिन आले आहेत.

ऑटो मार्केट सध्या सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्यास सज्ज आहे. कारण बाजारात सध्या एका मोटार सायकलची चांगलीच चर्चा असल्याचं पहायला मिळतंय. Hero Splendor ने बाजारातील आपला दबदबा कायम ठेवला आहे. प्राथमिक रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट महिन्यात Splendor ची विक्री 21 टक्के झाल्याचं दिसलं होतं.

भारतीय बाजारात Hero Splendor ची बंपर विक्री होत आहे. ऑगस्ट महिन्यात या गाडीचे 2.5 लाख युनिट विकले गेले होते. जे मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 18 टक्क्यांनी जास्त आहे. ऑगस्ट 2021 मध्ये स्प्लेंडरचे 2.41 लाख युनिट विकले गेले होते. याचप्रमाणे 2022 च्या विक्रीवर नजर टाकली तर दोन लाख पन्नास हजारहून अधिक युनिट विकले गेले आहेत.

Hero कंपनीने आणखी काही मॉडेल बाजारात आणले आहेत. यामध्ये Splendor plus, Splendor plus canvas, splendor i-smart आणि Splendor plus xtec या मॉडेल्सचा समावेश आहे. या सर्व मॉडेल्सची एकूण विक्री पाहता Splendor ची विक्री अधिक आहे. गेल्या महिन्यात 2,86,007  ग्राहकांनी स्प्लेंडर खरेदी केली होती.

दुसऱ्या नंबर होंडाची सीबी शाईन होती. 1,20,139 ग्राहकांनी सीबी शाईन खरेदी केली. तसं बघितलं तर सीबी शाईन देशातील दोन नंबरची सर्वात जास्त विक्री होणारी गाडी आहे. पण हिरो स्प्लेंडरच्या विक्रीतील तफावत दुप्पट होती. तर तिसऱ्या नंबरवर असलेली बजाज प्लॅटिना ही गाडी 99,987 ग्राहकांनी खरेदी केली.

भारतीय बाजारात हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत 70,658 रुपये आहे. एकुणच ही सगळी गाडीची विक्री लक्षात घेता भारतातील ऑटो मार्केटला अच्छे दिन आल्याचं चित्र आहे.

थोडक्यात बातम्या- 

“खोटी स्वप्ने दाखवून भारताला बेरोजगार करणारे मोदी हे इतिहासातील एकमेव पंतप्रधान”

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More