बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

मुंबई | ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा डाव साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारने आखला आहे. त्याविरोधात राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक अभिनव आंदोलन छेडलं आहे. एफआरपीच्या तुकडीकरणाविरोधात एका टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देण्याचं आवाहन राजु शेट्टी यांनी केलं होतं. ही मोहिम 12 सप्टेंबरपासुन सुरू झाली असुन या मोहिमेस राज्यभरातून शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

स्वाभिमानीकडुन राज्यभर सुरू असलेल्या या अनोख्या मोहिमेत फक्त तीन दिवसांत सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांकावर मिस्डकॉल देवुन सहभाग नोंदवला आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी दिली आहे. ऊसदर अर्थात एफआरपीच्या तुकडीकरणाच्या निर्णयाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असुन त्याचे रूपांतर हळुहळु लढ्यामध्ये होताना दिसत आहे.

या निर्णयानुसार 60% रक्कम ऊस तुटल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्यात , 20% रक्कम गळीत हंगाम संपल्यावर व उर्वरती 20% रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर शेतकर्यांना बिल मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एक रक्कमी एफआरपीचे च कायदेशीर कवच शासन काढून घेत आहे. यामुळेच या अनोख्या मोहिमेस शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

दरम्यान, या लढ्यासंदर्भात राजु शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात सर्व ऊस उत्पादक शेतकरी मोठं जनआंदोलन उभं करणार आहेत. येत्या काळात एक मोठा लढा यानिमित्ताने स्वाभिमानी लढेल असंही रणजीत बागल बागल  म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More