बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | भारतीय वंशाचे असलेल्या डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Prime Minister Narendra Modi) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी (industrialist Gautam Adani) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी नरेंद्र मोदी, वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी कोणत्याही कागदपत्राशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरकडून या प्रकरणी केस दाखल केली गेली आहे.

न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ अशी टीका केली आहे. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More