बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल

पुणे | सोशल मीडिया हे अभिव्यक्त होण्याचं एक स्वतंत्र माध्यम आहे. पण याच सोशल मीडियाचा वापर गैरप्रकार करण्यात देखील करण्यात येतो. त्यामुळे आतापर्यंत अनेकांवर गुन्हे झाले आहेत. आता शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मॉर्फ करणं 13 जणांना भारी पडलं आहे. महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 13 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो मॉर्फ करुन फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर महाआघाडीतील नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आकाश शिंदे नावाच्या व्यक्तीनं पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले, अशी या 13 जणांची नावं आहेत. या 13 जणांनी सोशल मीडियावर फोटो मॉर्फ करून पोस्ट अपलोड केली होती.

दरम्यान, काही दिवसाआधी नाशिक येथील हॉस्पिटल पाहणी दौऱ्या दरम्यान देखील काही जणांनी फडणवीस यांचा व्हिडीओ शूट केला होता. त्यात त्यांनी फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका केली होती. याप्रकरणी देखील नाशिक रोड पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांच्या गस्त पथकावर हल्ला ; पाहा व्हिडीओ

“दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?”

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी दरवाढ; जाणून घ्या नवे दर

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More