पुणे | मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि बेकायदेशीर जमाव केल्याच्या कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांच्या शासकीय गाडीच्या काचा फोडल्या. या प्रकरणी वसंत मोरे यांच्यावर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंत मोरे यांना पोलिसांनी अटक केली आणि कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी त्याच्यावतीने ऍड. गणेश म्हस्के आणि ऍड. सतिश कांबळे यांनी वसंत मोरे यांना जामीन देण्याची मागणी केली होती. प्रथमवर्ग न्यायाधिश जानवी केळकर यांनी वसंत मोरे यांचा जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सध्या पुण्यात सगळीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोेन लाखांच्या वर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कंगणाच्या प्रकरणावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रया; म्हणाले…
कंगणा राणावत मुंबईत दाखल, शिवसेनेकडून विमानतळावर घोषणाबाजी
कंगणा राणावतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा!
पुण्यात ‘या’ रक्त गटांच्या प्लाझमांचा तुटवडा
“याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही पण कंगणावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी”