राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

बीड |  अखेर चार दिवसांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले होते. आज सकाळी 7.30 वाजता बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने मुंडे आणि राष्ट्रवादीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम म्हणून दिली होती. पण हीच जमीन धनंजय मुंडेंनी पदाचा गैरवापर करत सहकारी कारखान्यासाठी विकत घेतली असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हणणं आहे.

नियमानुसार इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण दबाव आणून सदर जमिनीची खरेदी केल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. सरकारी जमीन हडपल्याचा उल्लेख चुकीचा असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. मुंडेंनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस

-राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

-दिशाबाबत विचारताच आदित्य ठाकरे लाजले!

-माढ्याच्या खासदारांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

Google+ Linkedin