Top News महाराष्ट्र सातारा

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

सातारा | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचे वारसदार खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषेदत छत्रपतींचे वारस असलेल्या राजांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आंबेडकर यांचा निषेध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान, शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाचे भागवत कदम यांनी केलेल्या तक्रारीवरुन अॅड. आंबेडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वीज बिल कमी केलं नाही तर उपोषणाला बसू, मनसेचा इशारा

“आधी शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा आणि मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करा”

राज्यात संपूर्णपणे अनलॉक कधी?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या