बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिहारच्या राजकारणात खळबळ! ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली | बिहारच्या राजकारणातील चर्चेत असलेलं पासवान घराणं वेगळ्याचं कारणाने चर्चेत आलं आहे. लोक जनशक्ती पार्टीचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघाचे खासदार असलेले प्रिन्स राज पासवान हे चिराग पासवान यांचे चुलत बंधू आहेत. प्रिन्स यांच्यावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोप करणारी तरूणी ही लोकजनशक्ती पक्षाची कार्यकर्ता आहे. खासदार प्रिन्स यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे. हा गुन्हा दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

लोक जनशक्तीचे अध्यक्ष चिराग पासवान यांचं सुद्धा नाव या प्रकरणात आलं आहे. या तरूणीने म्हटंले की, मी चिराग पासवान यांना या प्रकरणाबाबत अध्यक्ष या नात्याने सांगितले होते. पण चिराग पासवान यांनी माझ्या बोलण्याची दखल घेतली नाही. परिणामी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. चिराग पासवान यांनी मला गुन्हा दाखल करू नको, असं सांगितलं होतं.

दरम्यान, केंद्रीय मंत्री पशुपती पारस हे प्रिन्सराज पारस यांचे चुलते आहेत. या सर्व प्रकरणामुळे लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पण पासवान कुटूंबीयांना बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचं चिराग म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांचे वाढीव पदांच्या मंजुरीसाठी बेमुदत उपोषण

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More