मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 100 कोटी वसूली प्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाणार आहे. सीबीआयची टीम अनिल देशमुखांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी आर्थर रोड येथील कारागृहात पोहोचली आहे.
सीबीआयच्या टीमने कालदेखील अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला होता. इतकंच नाही तर उद्याही अनिल देशमुखांचा जबाब नोंदवला जाणार आहे. अनिल देशमुखांचा जबाब सलग नोंदवला जात आहे. त्यात अनिल देशमुखांना कोणते प्रश्न विचारले जात आहेत हे गुलदस्त्यात असल्याने सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे.
सीबीआयची एक टीम अनिल देशमुखांचा कबुली जबाब नोंदवण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात पोहोचली आहे. ही प्रक्रिया किती तास चालेल याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. तर देशमुखांचे वकील इंदरपाल सिंग देखील आर्थर रोड तुरूंगात उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुखांच्या चौकशीनंतर एक 65 पानी अहवाल सादर केला होता. या अहवालात अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं नमूद होतं. त्यामुळे सीबीआयने प्राथमिक अहवालात देशमुखांना क्लिनचिट दिल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता पुन्हा सीबीआयकडून देशमुखांचा कबुली जबाब नोंदवला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात ‘भाजपाल’ आहे”
मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली
Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेत वादाची ठिणगी?, महत्त्वाची माहिती समोर
रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
Comments are closed.