मुंबई | दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मागणी केली की पवारांनी माढा मतदारसंघातून उभं राहावं, त्यावर पवारांनी यांनी मी विचार करतो असं सांगितलं आहे, असं माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत.
शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. याविषयाबाबत माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार मोहिते पाटील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विचार करण्याची तशी गरजही नाही. तसा निर्णय झालेला आहे, पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे तो पवार साहेबांना आमच्या आग्रहास्तव मान्य करावा लागेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या सर्व चर्चांबाबत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी शरद पवार यांनी दिल्लीत मानाने गेलं पाहिजे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-खरंच देवेंद्र फडणवीस बारामतीत पवारांना आणि शिरूरमध्ये आढळरावांना चारी मुंड्या चित करणार?
–अखेर पुणतांब्यांतील बळीराजाच्या पोरींचं अन्नत्याग आंदोलन मागे
-“सर्जिकल स्ट्राईक करुन आम्ही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली”
-महाराष्ट्रातून यावेळी ’45 खासदार’ निवडून द्या, राज्यातल्या जनतेला अमित शहांची साद
–महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार- देवेंद्र फडणवीस