बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआरचा दावा 

नवी दिल्ली | कोरोनाची सामना करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही भारतात राबली जात आहे. जवळपास 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत झाले आहेत. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. पंरतु लस घेतल्यानंतर अँडीबाॅडी कितपत प्रभावी होत आहे यावर भाष्य करणारा एक अहवाल आयसीएमआरने प्रसिद्ध केला आहे.

कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ज्याप्रमाणात अँटीबाॅडी तयार होतात, त्याप्रमाणात कोव्हॅक्सिन लसीचा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अँटीबाॅडी आढळून येतात, असं आयसीएमआरच्या एका अभ्यासात दिसून आलं आहे. आयसीएमआरचा हा अभ्यास निवारी इंडियन जर्नल मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

एसआरएस- कोविड-2 ची लागण झालेल्या लोकांना बीबीवी 152 लसीचा एकच डोस दिला जाऊ शकतो. जेणेकरून मर्यादित लस साठ्यामध्येही जास्त लोकांचे लसीकरण केलं जाऊ शकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे. कोव्हॅक्सिनचे बीबीवी 152 असं कोडनेम आहे. ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस आहे. जानेवारीत या लसीला आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली होती.

दरम्यान, 4 ते 6 आठवड्यांच्या फरकाने लसीचे दोन डोस दिले जातात. सध्या देशभरात लसीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पण अद्याप काही ठिकाणी लसीकरण मोहिम मंदावल्याचं दिसतंय. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी वेगवान होण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

“अनिल परब यांना ठाकरे सरकारने स्वतःहून अटक केली नाही तर…”

काबूल विमानतळाबाहेर चकमक; अमेरिकन सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांचा विरोध केला म्हणून पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More