रायपूर | देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. वृद्ध व्यक्तींना या टप्यात लस दिली जात आहे. याआधी पहिल्या टप्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली होती. या लसीकरणावरून राजकारण देखील पेटलं होतं. आता काँग्रेसच्या एका नेत्याने लसीच्या निर्माण प्रकियेवर संशय व्यक्त करत लस घेण्यास नकार दिला आहे.
छत्तीसगडमधील बोडला नगरपंचायतमधील अन्न आणि नागरी पुरवठा आणि आरोग्य आणि वैद्यकीय विभाग अध्यक्ष ओेमप्रकाश शर्मा यांनी कोरोना लसीकरणाबद्दल अजब दावा केला आहे. शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी एक पत्र लिहलं आहे. लसीमध्ये गाय, डुक्कर आणि गर्भपात केलेल्या बाळाच्या मांसातील प्रथिनांचा समावेश आहे, असा दावा ओेमप्रकाश शर्मा यांनी केला आहे.
धर्माचा आधार देत, मला या लस घेण्यापासून सूट द्यावी, अशी मागणी या पत्राद्वारे शर्मा यांनी केली आहे. माझा धर्म हिंदू आहे. ही लस घेतल्याने माझा धर्म भ्रष्ट होईल. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला या लसीपासून सुटका देण्यात यावी, अशी मागणी ओेमप्रकाश शर्मा यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत.
थोडक्यात बातम्या-
नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना
अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; अजित पवार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
कर्नाटकमधील मंत्र्याच्या SEX CD प्रकरणात आला हा मोठा ट्विस्ट!
Comments are closed.