बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भविष्य मोलाचं पण जीव अनमोल आहे’; ‘एमपीएससी’ पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

मुंबई | कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच सरकारमधील आणि विरोधातील या दोन्ही बाजूच्या नेेत्यांनीही ही माहणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी करण्यात येत आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो, अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता या महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. बरेच विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची ही मागणी आहे. भविष्य मोलाचे पण जीव अनमोल आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

एमपीएससी विद्यार्थींच्या 11 तारखेची परीक्षा तातडीने पुढे घेण्यात घ्यावी. कोरोनाची ही दुसरी लाट भयंकर आहे सगळीकडे तुम्ही लॉकडाऊन केले आहे ,काही विद्यार्थी तर कोरोना बाधित आहे, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असं ट्विट मनसे नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांंनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More