पुणे महाराष्ट्र

पुण्यात हा काय प्रकार सुरुय?; सविताभाभी तू इथंच थांब!

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर पोस्टरबाजीमुळे प्रसिद्धीस येत आहे. कोणाचंही नाव न घेता पुण्यात करण्यात येणारी पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘शिवडे… आय एम सॉरी’ असे पोस्टर पिंपरीत सगळीकडे झळकले होते. मात्र आता सविता भाभी…तू इथंच थांब, असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत. यावर कोणाचंही नाव लिहिण्यात आलं नाही. यामुळे हे पोस्टर कोणी आणि का लावलेत?, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.

पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सविता भाभी…तू इथंच थांब असं लिहिलेलं पोस्टर लावण्यात आलेत. तसेच या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

कोणाचंही नाव न घेता पोस्टर लावण्यात आल्याने या पोस्टरबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तसेच हा जाहिरातीचा फंडा असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘आमचं उष्ट कोणी खाऊ नये’; गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

महत्वाच्या बातम्या- 

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

छत्रपतींचा वंशज म्हणून असलं क्रूर कृत्य कदापी सहन करणार नाही- संभाजी राजे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या