बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

जयपूर | आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की, मगर ही पाण्यात राहून सगळ्या प्राण्यांवर बारीक नजर ठेवत असते. पाण्याजवळ कोणी आलतरी तिला लगेचच त्याची चाहूल लागते. तसेच तिने जर कोणत्या प्राण्याची शिकारी करायची ठरवली, तर त्या प्राण्याचा जीव घेई पर्यंत ती त्या प्राण्याचा पिछा सोडत नाही.

सध्या मगरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मगरीने पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्याचं दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये नदीवर एक कुत्रा पाणी पिण्यासाठी गेला आहे. पाणी पित असताना, पाण्यातील मगरीला कुत्र्याची चाहूल लागते. त्यानंतर ती हळू-हळू त्या कुत्र्याचा दिशेने येऊ लागते. एका ठिकाणी पाणी पिऊन झाल्यानंतर तो कुत्रा पुन्हा नदीच्या दुसऱ्या भागात गेला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

तोपर्यंत पाण्यातील मगर त्या कुत्र्याच्या खूप जवळ आलेली असते. परंतू त्या कुत्र्याला यासगळ्याची काहीच माहिती नसते. पाणी पिल्यानंतर तो नदीच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी मागे वळतो. तेवढ्यात मगर आपला डाव साधते आणि त्याच्यावर झडप घालते. हे सगळ अचानक घडलं असल्यामुळे कुत्र्याची धांदड उडते. मात्र मगरीने त्या कुत्र्याला आपल्या जबड्यामध्ये चांगलंच दाबून धरलं असल्याचं दिसून येतं आहे. तसेच हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याचं समजतंय. या व्हिडीओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहिलं आहे.

पाहा व्हिडीओ- 

 थोडक्यात बातम्या-

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

“सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा धोका वाढला; गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More