बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया!

पुणे | नेपाळमधील एका चिमुकल्या मुलाच्या पोटात मृत गर्भ आढळल्याने सगळ्यांना धक्काच बसला आहे. जगभरातून आतापर्यंत दोनशे अशी प्रकरणं नोंदली गेली आहे. आईच्या पोटात दोन गर्भ होते, त्यापैकी एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या दीड वर्षाच्या या मुलावर पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. जवळपास अर्ध्या किलोचं हे मृत गर्भ होतं अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.

नेपाळच्या महिलेची दीड वर्षापूर्वी प्रसुती झाली होती. त्यात जन्मलेल्या त्यांच्या मुलाला नेहमीच आरोग्याला घेऊन तक्रारी असायच्या, पोटात दुखायचं, अलीकडं तर त्याच पोट गरोदर महिलांप्रमाणे वाढू लागलं होतं. त्यात परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी मुलाला उपचारासाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात आणलं. बालरोग तज्ज्ञ डॉ. शैलजा माने यांनी गरजेच्या सर्व चाचण्या करुन घेतल्या तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. त्यावेळी डाॅक्टरांनी सांगितलं पाच लाख बालकांमागे एखाद्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते. याला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटू’ असं म्हणतात.

सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन केल्यानंतर त्यात हा गर्भ मुलाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचं दिसून आलं. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचं तपासणीअंतर्गत स्पष्ट झालं. त्यामुळे ही गाठ वेगळी करणं फार मोठं आव्हान बाल शल्यचिकित्सकांसमोर होतं. मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत, मूत्राशय आणि आतडे ह्या अवयवांना कोणतीही इजा होऊ न देता, ही संपूर्ण गाठ काढण्यात डाॅक्टरांना यश आलं. यासाठी बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमला सहा तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचं परीक्षण करण्यात आलं आहे. या गाठीमुळे चिमुकल्याला भविष्यात कोणताच धोका नसल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. या गर्भ गाठीचं वजन 550 ग्रॅम आहे. हात आणि पायची बोटं, त्वचा, केस, हाडे तसच मायक्रोस्कोपमध्ये बाकीचेही अवयव दिसून आले. यावरुन हे ‘फिट्स इन फिटू’ असल्याचं निदान झालं आहे. हा मुलगा आता इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतो. त्यामुळे त्याला डिस्चार्ज दिला असून त्याच्या आई-वडिलांनी रुग्णालयाचे आभार मानले आहे.

थोडक्यात बातम्या

मराठा समाजाला आरक्षण तरी द्या, अथवा आम्हाला विष पिऊन मरु द्या- उदयनराजे भोसले

“सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी, विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये”

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More