बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

नवी दिल्ली | एका व्यक्तीच्या मृत्यूचा मुद्दा बनवला जात आहे. मात्र दुसरीकडे लसींचे दोन डोस घेऊनही अनेक डॉक्टर मरण पावले. त्यांचं काय?, असं बाबा रामदेव म्हणाले. ते न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

बीपी, शुगर, अस्थमा, आर्थरायटिस अशा रुग्णांना आयुर्वेदाद्वारे पूर्ण बरे करण्याचं आव्हान स्वीकारण्याची तयारीही रामदेव बाबांनी दाखवली. तसेच 90 टक्के कोरोना रुग्ण योग आयुर्वेदाच्या मदतीने ठीक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सर्जरीवरील वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनातून देशाला वाचवण्यात डॉक्टरांचं मोठं काम आहे, हे मी मान्य केलं आहे, पण तसं असलं तरी 90 टक्के रुग्ण बरे करणाऱ्या आयुर्वेदाला कमी लेखण्याचं काम करू नये. तसेच मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना नमन करतो. त्यांना कमी लेखत नाही. मात्र प्रत्येकवेळी आयुर्वेदाला कमी लेखलं जातं, असं बाबा रामदेव म्हणाले.

दरम्यान, रामदेव बाबांनी अॅलोपॅथी संदर्भात दिलेल्या वक्तव्यावरून IMA ने त्यांच्यावर 1000 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. यावर बोलताना हा वाद संपवण्याची मनापासून इच्छा असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

…म्हणून आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची नोटीस

मुंबईतील कोरोना आटोक्यात; वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद; वाचा संवादातील महत्वाचे मुद्दे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More