नवी दिल्ली | भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या दोन्ही लसींना परवानगी देण्यात आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
या मोहीमेसाठी जीवतोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन, असंही मोदींनी म्हटलं आहे. यासंदर्भात मोदींनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, कठीण परिस्थितीममध्ये असाधारण सेवाभावासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व करोना योद्ध्यांच्याप्रती कृतज्ञता व्यकत करतो आहे.देशवासियांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही सैदव त्यांचे आभारी राहू, असं मोदी म्हणाले.
वैश्विक महामारी के खिलाफ भारत की जंग में एक निर्णायक क्षण!
@SerumInstIndia और @BharatBiotech की वैक्सीन को DCGI की मंजूरी से एक स्वस्थ और कोविड मुक्त भारत की मुहिम को बल मिलेगा।इस मुहिम में जी-जान से जुटे वैज्ञानिकों-इनोवेटर्स को शुभकामनाएं और देशवासियों को बधाई।
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका
भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!
‘वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा’; नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र
‘ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट”
कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले…’देश आत्मनिर्भर होतोय’