नवी दिल्ली | गेले 60 दिवस इतक्या शांतपणे चालू असलेलं शेतकरी आंदोलन आज चिघळल्याचं दिसत आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.
या वादातूनच शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष पेटला. शेतकरी आंदोलकांची संख्या जास्त असल्याने त्यांनी दिल्ली पोलिसांच्या अंगावर धावून गेले, दगडफेक केली त्यानंतप पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत शेतकऱ्यांनी आपलं उग्र रूप धारण केलं. मात्र यामध्ये एक चांगली गोष्ट दिसून आली.
संतप्त आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलिस अडकला होता. पोलीस एकटाच पळत होता तेव्हा सभोवतली असणाऱ्या आंदोलकांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पोलिसाची सुटका करण्यासाठी एका शेतकऱ्याने धाव घेतली आणि सुरक्षितपणे पुढे नेलं.
दरम्यान, दक्षिण दिल्लीमधील आयटीओ परिसरात हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला असला तरी आंदोलनातील काही शेतकऱ्यांना हे आंदोलन हिंसेने नाही तर शांततेच्या मार्गाने करायचं असल्याचं दिसून आलं.
#WATCH: A Delhi Police personnel rescued by protesters as one section of protesters attempted to assault him at ITO in central Delhi. #FarmLaws pic.twitter.com/uigSLyVAGy
— ANI (@ANI) January 26, 2021
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी
“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”
दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!
“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज
Comments are closed.