बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे

मुंबई | मी आणि उपमुख्यमंत्री आपल्या सोबत आहोत. शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवल्या पाहिजेत. संपर्कात रहा मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल, असं आश्वासन शिंदेनी जनतेला दिलं. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन ( Diaster Mangement) बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळते त्या जागा नवीन आहेत. यामुळे आता दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी  आणि पालिकांनी सज्ज रहावं. वाॅर रूम यंत्रणा सज्ज करून ठेवाव्यात, अशी माहिती एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

275. मि.मी पाऊस  (Rain) पडला तरीही पाणी तुंबलं नाही पालिका आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेमुळे कोणालाही त्रास झाला नाही. वाहतूक व्यवस्थित सुरळित सुरू होती याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी समाधान व्यक्त केलं.

या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबईमध्ये पाऊस चालू झाला की इमारती कोसळण्याचं प्रमाण वाढतं. प्रत्येक वार्ड मध्ये धोकादायक इमारतीच्या रहिवाश्यांना समजतील अशा भाषेत नोटीस पाठवण्यात आली आहे. दुर्घटना घडल्यास संबधित अधिकऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

थोडक्यात बातम्या

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…

संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More