बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात; पिंपरीतील ‘भाईचा बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

पुणे | पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात गुंडगीरीच्या घटना वाढत आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतं आहे. अशातच एका भाईला आपली दहशत निर्माण करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यानं वाढदिवसाच्या दिवशी फेसबूकवर अशी एक पोस्ट टाकली की त्यामुळे त्याला थेट कोठडीत जावं लागलं.

पिंपरीत राहणारा अजय काळभोर याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी या भाईने फेसबूकवर एक पोस्ट टाकली. ज्यामध्ये लिहलं होतं, ‘कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड में अपनाही नाम होगा’. या पोस्टवर त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यानही कमेंट केली आहे. अजय काळभोर याचा साथीदार असलेल्या प्रशांत सोनावणे याने त्याला शुभेच्छा देत म्हटलं, ‘भाऊ आमचा बाप तुमचा’.

पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. तसेच पोलीस सोशल मीडियावरही नजर ठेवून असतात. पोलिसांना ही फेसबूक पोस्ट दिसली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई केली.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अजय विलास काळभोर, त्याचा साथिदार अनिल प्रशांत सोनावणे आणि काळभोर याचं फेसबूक अकाऊंट सांभाळणारा सोमनाथ देवाडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या ‘भाई’ला आपला वाढदिवस कोठडीतच साजरा करावा लागला. पोलिसांनी गुरुवारी या आरोपींना न्यायलयात हजर केलं त्यावेळी त्यांना जामिनावर सोडून देण्यात आलं.

थोडक्यात बातम्या – 

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट कोसळलं; एका पायलटचा मृत्यु, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More