आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव
मुंबई | सोशल माध्यमांवर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेेले पाहतो. त्यामध्ये अनेक व्हिडीओ हे आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओचा ट्रेंड चालू असतो. मात्र काही व्हिडीओ असे असतात की ते आपल्या मनाला लागतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला वाहतूक पोलीस अधिकारी आपल्या बाळाला घेऊन आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे.
मार्च महिना चालू झाला आहे बदलत्या ऋतूनुसार वातावरणातही बदल झालेला दिसत आहे. सध्या उन्हाची चाहूल वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक एसी, कुलर लावत आहेत. मात्र या उन्हात आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन झाशीच्या राणीप्रमाणे एक महिला पोलीस अधिकारी आपली कर्तव्य पार पाडत आहे.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधीलउत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तर त्यांनी या व्हिडीओला ‘ममत्व आणि कर्तव्याचा संगम’, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ चंदीगढचा असल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडीओवरून संबंधित महिला अधिकारीचं कौतुक होत आहे तर काही नेटकऱ्यांनी यावरून पोलीस खात्यावर टीका केली आहे.
दरम्यान, संबंधित महिलेची ड्युटी वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये लावायला हवी, जेणेकरून तिच्या बाळाच्या आरोग्याला काही हानी पोहोचणार नाही. बाळाला विनाकारण उन्हात रहावं लागत आहे.
ममत्व और कर्तव्य का संगम !!❤️#Chandigarh #Khaki #JaiHind pic.twitter.com/mQo4ODujgt
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) March 5, 2021
थोडक्यात बातम्या-
रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…
उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे
पुजा चव्हाण प्रकरणात भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस
‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं
Comments are closed.