बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास द्यावा लागणार 1200 रुपये दंड

मुंबई | कोरोनाचा संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी मुंबई महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास घेण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत होता.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रुपयांचा दंड हा 1200 रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता इथून पुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना मोठा आर्थिक दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाचं सामान्य मुंबईकरांनी स्वागत केलं असून यामुळे शहरात स्वच्छता तर राहीलच, शिवाय रोग देखिल पसरणार नाही.

मुंबईमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात यावा, अशी मागणी सध्या सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावर थुंकल्यास आता 1200 रुपये दंड नागरिकांना भरावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या –

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More