बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अहमदाबादमधील शाळेच्या इमारतीला भीषण आग; जवानांनी सर्वांना सुखरुप बाहेर काढलं

अहमदाबाद | अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील एक शाळेत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अँकर स्कुल या शाळेत अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवता आलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील सर्वाना सुरक्षित बाहेत काढलं आहे. या शाळेच्या इमारतीमधून आगीचे मोठे लोळ उठत होते. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 10 गाड्या लवकर पोहचल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना लवकर आग नियंत्रणात आणता आली.

आग नियंत्रणात आणल्यानंतर सध्या कुलिंग प्रोसेस चालू आहे. या घटनेबाबत अजून कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली गेली नाही. शाळा बंद असल्याने या आगीत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील काही दिवसांपुर्वी आगी लागण्याचं सत्र सुरू होतं. पुण्याच्या लष्कर परिसरात आग लागल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. तर काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला देखील भीषण आग लागली होती.

थोडक्यात बातम्या-

IPL 2021 : MI vs RCB, ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

‘ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामानं पाडलं तो आता…’; अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

“केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, ठाकरे सरकार सध्या एवढंच करतंय”

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More