बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

मेक्सिको | आतापर्यंत जमिनीवर कित्येक ठिकाणी घटना ऐकल्या किंवा बघितल्या असतील पण भर समुद्रा आग लागल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रात ही आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान प्रायद्वीपच्या पश्चिमेच्या बाजूला समुद्रात अचानक मोठी आग लागली. त्या आगीच्या आवाजानं समुद्र किनाऱ्यावर देखील मोठा हादरा बसला. पेमेक्स ऑइल प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावर ही आग लागली होती. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. ही आग विझवण्यासाठी 5 तासाहून अधिक वेळ लागाल, अशी माहिती मेक्सिकोची सरकारी तेल कंपनी पेमेक्सानं दिली आहे.

पेमेक्सच्या प्रमुख कु मालूब जाप ऑईल डेव्हलपमेंटच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पाण्याखालून ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पाइपलाइनमधून ही आग सुरू झाली, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. ही आग गोलाकार स्थितीत लागल्यानं, या आगीला स्थानिकांनी आय ऑफ फायर म्हणजेच आगीचा डोळा असं नाव दिलं आहे.

दरम्यान, कंपनीनं या आगीचं कारण पाण्यातील पाइपलाइनमधून झालेली गॅस गळती असल्याचं सांगितलं आहे. या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. तसंच गॅस गळतीमुळे प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनावरही परिणाम झाला नाही. मोठी जहाजं आणि हेलिकाॅप्टरच्या मदतीनं ही आग विझवण्यास अखेर यश आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; आचार्य तुषार भोसले भडकले

अनिल देशमुखांचा अचानक दिल्ली दौरा; ईडीची पिडा संपवण्यासाठी नवा मार्ग शोधणार?

काही गैरसमज झाले पण यापुढे असं होणार नाही- अजित पवार

बंडातात्या कराडकर पायी वारीवर ठाम; सरकारचा आदेश झुगारल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्र सरकारविरोधात बाॅलिवूडचे कलाकार एकवटले, नव्या सिनेमॅटोग्राफ विधेयकाला जोरदार विरोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More