बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

पुणे | काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ फॅशन स्ट्रिटला भीषण आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच मुळशी तालुक्यातील सॅनिटायझर उत्पादक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात आता गुरुवारी मध्यरात्री पुण्याच्या मुख्य भागात असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग लागली आहे.

महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागात असलेल्या लाकडी भागाला ही आग लागली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या आणि पाण्याचा 1 टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचेपर्यंत आतील सर्व भाग जळून खाक झाला होता.

दरम्यान, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आलं आहे. अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीचं कारण, इमारतीचं नुकसान किती झालं हे आत्ता लगेच सांगता येणार नाही, असं अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिल्याने गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली!

‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

रितेश-जेनेलियाचा ‘तो’ मजेशिर व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More