बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुवर्णसंधी! इस्रोकडून पाच दिवसांचा मोफत सर्टिफिकेशन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली | इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन म्हणजेच इस्रोकडून 5 दिवसांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक उमेद्वारांना फक्त एक अर्ज भरायला लागणार आहे. विशेष बाब म्हणजे हे प्रशिक्षण विनामूल्य असून याच्या पुर्णतेनंतर प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये पाच विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये पर्यावरण अभ्यास, भूगोल, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, आर्किटेक्चर आणि स्थापत्य इंजिनीअरींच्या उमेद्वारांचा समावेश आहे. हा कोर्स 11 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत असणार आहे.

या प्रशिक्षणाचा विषय अमृत उपयोजने अंतर्गत मास्टर प्लॅन फाॅर्म्युलेशन सक्षम करण्यासाठी भू-स्थानीक इनपूट म्हणजेच Geospatial Inputs for Enabling Master Plan Formulation under AMRUT Sub-Scheme, असा आहे. प्रोग्रामचा संपूर्ण तपशील, अंमलबजावणी आणि वितरण, रिमोट सेन्सिंग डेटा सेटची माहिती यामध्ये शिकविली जाणार आहे. शहरी वैशिष्ट्यांची ओळख आणि व्याख्या, ज्योग्राफिकल इन्फोर्मेशन सिस्टिम आणि मॉडेलिंग, मॅप प्रोजेक्शनचा अभ्यासक्रमाचा देखील यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, या कोर्सची अधिक माहिती इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर असून इच्छुक उमेद्वारांना तिथनच अर्ज भरता येईल. इस्रोच्या ऑफिशअल वेबसाईटवर ई-लर्निंग पर्यायवर क्लिक करुन आपली माहिती देऊन हा अर्ज भरता येईल. तसेच हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?, नवाब मलिकांचं भाजपला खुलं आव्हान

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

MI vs SRH: प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईला खेळावी लागणार अफलातून खेळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More