बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबईतील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला, दहाजण जखमी

मुंबई | बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचं काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली.

पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले.

मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केलं आहे.

हा उड्डाणपूल कसा पडला, याचं कारणही अद्याप समजलेलं नाही. तसेच खमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही.

थोडक्यात बातम्या- 

धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, माहीकडे आता नवी जबाबदारी!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा आजचे दर एका क्लिकवर, आजही दरात घसरण

शिवसेना म्हणजे काय?, राहुल गांधींच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, फटे लेकीन…

इसिसचा तालिबान्यांना धोबीपछाड???, काबूलवर मोठे रॉकेट हल्ले; पाहा व्हिडीओ

वाघ तो वाघच! T-20मध्ये जगातील एकाही कर्णधाराला जमला नाही ‘तो’ पराक्रम कोहलीच्या नावावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More