बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्या लायकीनुसार नुकसानाची किंमत ठरते’; निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

मुंबई | राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी नेहमीच पाहायला मिळत असते. आता भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली. यातच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते निलेश राणेंनी खोचक शब्दांत समाचार घेतला आहे.

संज्यासारखा मूर्ख संज्याच… आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या लायकीनुसार नुकसानाची किंमत ठरते. संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा संज्याने स्वतःची किंमत ओळखली, असं ट्विट करत निलेश राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

लोक 50 कोटी 100 कोटींचा दावा दाखल करतात, पण मी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवारानं सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! कोरोना लस घेताना आतच तुटली सुई अन्…

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, अदानी म्हणाले…

‘…त्यांच्याकडे अमेरिका कट्टर शत्रू म्हणून पाहील’; बायडन यांचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; ‘या’ मुद्यांवर राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार

‘ही’ एक चूक संजू सॅमसनला पडली महागात; भरावा लागणार ‘इतक्या’ लाखांचा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More