नशिबाचा खेळ! बाॅल स्टंप्सला लागला तरीही बाद झाला नाही क्विंटन डिकाॅक, पाहा व्हिडीओ
जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉक बाद होता-होता राहिला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात थोड्यात पराभवाचा सामना करावा लागलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ हिशेब बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला.
या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या बाबतीत एक प्रकार घडला. पाकिस्तानचा शादाब खान गोलंदाजी करत होता, तर डिकॉक फलंदाजी करत होता. त्यावेळी शादाबचा एक चेंडू डिकॉकच्या बॅटवर थेट न येता मिस झाला बॅटच्या मागे लागून थेट स्टंपवर गेला. बॉल स्टंपला लागला, त्यामुळं स्टंपमधील ‘एलईडी’ही चमकले मात्र बेल्स पडले नाहीत. त्यामुळं क्रिकेटमधील नियमानुसार डिकॉक बाद होण्यापासून बचावला. आश्चर्यकारक रित्या डिकॉकला जीवदान मिळालं.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्या क्विंटन डिकॉक आणि अॅडेन मार्करामने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्याच पॉवरप्लेमध्ये पाक गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सलामीसाठी दोघांनी 55 धावांची भागिदारी केली. पण 10 व्या षटकामध्ये मार्कराम बाद झाला. मात्र, क्विंटन डीकॉकनं दुसरी बाजू सांभाळली होती. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार द्यायला सुरुवात करत अर्धशतक पूर्ण केलं.
दरम्यान, क्रिकेटमध्ये अनेक नियम आहेत आणि त्यात वेळोवेळी बदलही होत असतो. अशाच काही नियमांमुळे अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर असे प्रकार पाहायला मिळत असतात. पण अशा घटना क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्याही ठरू शकतात. कारण क्रिकेटध्ये प्रत्येक चेंडूवर सामना बदलण्याची शक्यता असते.
— tony (@tony49901400) April 4, 2021
थोडक्यात बातम्या –
कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस
वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!
अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड
सध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय!; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक
राज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.