बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नशिबाचा खेळ! लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीत

नवी दिल्ली | लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. लग्नाला जाणारी गाडी दरीत कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

शिल्लई उपमंडलमधील लग्नावरून वऱ्हाडाला घेऊन जाणारी एक गाडी पाशेंगाजवळील एका दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण पौंटा साहिब आणि शिल्लई उपमंडळाच्या सीमेवर आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत्यू झालेल्यांपैकी 08 जण हे एकाच गावातील आहे. 8 जण हे चढेऊ गावातील आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनच्या मदतीने मदत कार्य जोरात सुरू आहे. हे सर्वजण लग्नाला जात असल्याची माहिती समोर आली असून सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नाच्या शुभ मुहर्तावर असं काहीतरी अशुभ घडल्याने लग्नात देखील गोंधळ उडाला होता.

दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अद्याप अपघात कसा झाला? या बाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, यासंदर्भात देखील तपास सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

“ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल”

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More